WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSD: सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती (Solid-state drive in Marathi)

सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD – Solid-state drive) हे एक प्रकारचा स्टोरेज डिव्हाइस आहे जे डेटा साठवण्यासाठी नवीन तंत्रज्ञाचा म्हणजेच फ्लॅश मेमरीचा वापर ह्यामध्ये होतो. SSD हे आपण पारंपरिक वापरले जाणारे हार्ड डिस्क ड्राईव्ह (HDD) च्या तुलनेत खूप वेगवान आहे. तर आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण SSD विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

SSD म्हणजे काय?

सॉलिड स्टेट ड्राईव्ह एक लोकप्रिय वेगवान स्टोरेज डिव्हाइस आहे, ज्याचा प्रामुख्याने वापर हा डेटा साठवण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी केला जातो. SSD मध्ये डेटा साठवण्यासाठी फ्लॅश मेमरी चिप्सचा या संकल्पनाचा वापर केला जातो, ज्यामुळे तुमचा कॉम्पुटर किंवा लॅपटॉप याचा स्पीड वेगवान होते.

HDD हार्ड डिस्क च्या ऐवजी आपण जर SDD सॉलिड स्टेट ड्राईव्ह वापरल्याने संगणकाचा Operate करण्याचा वेग वाढतो, कारण HDD च्या तुलनेने SSD चा Read and Write Time वेळ खूप कमी असतो. संगणकाचा Operate वेग जास्त असल्याने वापरकर्त्यांना कमी वेळेत डेटा मिळवता येतो. SSD हे एक इलेक्ट्रॉनिक स्टोरेज आहे, यात कोणतेही Moving Part वापरण्यात आलेले नाहीत, यामुळे SSD चा लागणारा वेळ हा कमी असतो व कमी वीजेत सुद्धा तुमची SSD योग्यरीत्या कार्य करते.

SSD चे प्रकार

सॉलिड स्टेट ड्राईव्ह (Solid State Drive) चे अनेक प्रकार आहेत. सध्या बाजारात लोकप्रिय असलेल्या तीन मुख्य Types ची माहिती आपण घेऊयात.

1. SATA SSD

SATA SSD हे सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे SSD मॉडिफाइड व्हर्जन आहे आणि हे SATA इंटरफेसचा वापर करतात, जो तुमच्या HDD मध्ये देखील वापरला जातो. हे HDD च्या तुलनेत अगदी फास्ट असतात, परंतु NVMe SSD च्या तुलनेत आपल्याला ह्याचा वेग कमी असताना दिसतो.

2. NVMe SSD

NVMe SSD हे SSD PCIe इंटरफेसचा वापर करतात, ज्यामुळे डेटा ट्रान्सफरचा वेग अधिक असतो. हे विशेषतः आपल्याला उच्च कार्यक्षमतेसाठी आणि गेमिंगसाठी वापरण्यात पहायला मिळते. डेटा ट्रान्सफर प्रक्रियेसाठी यात PCI Express Lane ही System वापरली जाते जे कि NVMe Protocol वर ही SSD कार्य करते. या SSD ची Bandwidth 4 Gbps इतकी आहे.

3. M.2 SSD

M.2 SSD हे छोटे आणि सर्वात स्लिम SSD आहेत, जे लॅपटॉप आणि डेस्कटॉपमध्ये वापरले जातात. हे SATA आणि NVMe या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत. M.2 हे पूर्णपणे SATA SSD चे Modified Version आपल्यला पहायला मिळते. SATA SSD सारखेच M.2 SATA मध्ये SATA 3 Lane System वापरली जाते व AHCI Protocol वर M.2 SATA SSD कार्य करत असते.

4. U.2 SSD

U.2 SSD हे व्यवसायिक वापरासाठी डिझाइन केलेले SSD आहेत, जे उच्च क्षमता आणि वेग प्रदान करतात.

SSD सॉलिड स्टेट ड्राईव्ह वापरण्याचे फायदे

  • वेगवान/जलद – SSD हे HDD पेक्षा खूप वेगवान तंत्रज्ञान आहे. ह्यामध्ये तुमच्या संगणकाचा चालू होण्याचा वेळ, अप्लिकेशन लोडिंग वेळ आयासोबतच डेटा हस्तांतरण वेळ लक्षणीयरीत्या कमी केलेला आपल्यला पाहायला मिळतो.
  • SSD मध्ये कोणतेही जास्तीचे इतर भाग नसल्यामुळे ते HDD पेक्षा अधिक पसंद आपल्याला पाहायला मिळते. जाणीव ह्या तंत्रज्ञामधे डेटा नुकसानाचा धोका कमी आणि क्रॅश होण्याची शक्यता कमी आहे.
  • SSD हे HDD पेक्षा खूप कमी silent स्तितींमध्ये काम करतात . ते कोणताही आवाज निर्माण करत नाहीत, ज्यामुळे ते शांत वातावरणात वापरण्यासाठी योग्य बनते.
  • SSD तंत्रज्ञान कमी विद्युत वापरतात, ज्यामुळे ते लॅपटॉप आणि इतर मोबाइल डिव्हाइससाठी हे अगदी योग्य बनतात.
  • SSD हे HDD च्या तुलनेत हलके आहेत, ज्यामुळे ते लॅपटॉप आणि इतर पोर्टेबल डिव्हाइससाठी आपण ह्याचा सहज वापर करू शकतो.

SSD चे तोटे

SSD हे खुप महाग आहे. आपल्याला HDD च्या तुलनेत हे सरासरी पाच ते सात पटीने महाग पाहायला मिळते.

तुम्हाला SSD खरेदी करण्याची गरज आहे का ?

जर तुम्हाला अधिक वेगवान, अधिक विश्वासार्ह व कार्यक्षम स्टोरेज डिव्हाइसची आवश्यकता असेल तर तुम्ही SSD खरेदी करणं विचारात घेतला पाहिजे. परंतु SSD हे HDD पेक्षा खूप महाग असतात पण ह्याचेखूप वरीलप्रमाणे फायदे आहेत.

SSD निवडताना लक्षात राहूद्या तुम्ही तुमच्या बजेटचा विचार करा. SSD हे HDD पेक्षा महाग असतात. तुम्हाला किती स्टोरेजची आवश्यकता आहे ते पहिले ठरवा नंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची आवश्यकता आहे ते ठरवा यातही काही SSD इतरांपेक्षा वेगवान आपल्यला पहायला मिळते.

HDD डिस्क ड्राईव्हच्या तुलनेत ससद SSD अधिक वेगवान स्टोरेज डिव्हाइस आहेत. SSD च्या वापरामुळे तुमच्या संगणकाची, लॅपटॉपची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारेल.

धन्यवाद ! जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा…

abhishek-Rodi

अभिषेक रोडी (Abhishek Rodi )

नमस्कार मी अभिषेक रोडी, वेबमराठी.नेट (webmarathi.net) या मराठी संकेतस्थळावर लेखक. तंत्रज्ञान, सरकारी योजना आणि आर्थिक नियोजन या क्षेत्रात मराठी भाषिकांना माहिती आणि मार्गदर्शन देणे हा माझा प्रयत्न आहे.

Leave a Comment