WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sovereign Gold Bond म्हणजे नेमकं काय? सार्वभौम सुवर्ण बाँड SGB Bond

SGB Gold Bond: सोने हे एक मौल्यवान गुंतवणुकीचे साधन मानले जाते. सार्वभौम सुवर्ण रोखे ज्याला आपण SGB बॉण्ड ह्या नावाने जाणतो हे भारतातील नागरिकांना सरकारद्वारे सोने मध्ये गुंतवणूक करण्याचा एक सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग प्रदान करते. आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण Sovereign Gold Bond म्हणजे काय, त्याचे फायदे इत्यादी सर्व माहिती पाहणार आहोत.

SGB Bond काय आहे? (सार्वभौम सुवर्ण बाँड)

सार्वभौम सुवर्ण बाँड (SGB – Sovereign Gold Bond) हि योजना भारत सरकारद्वारे जारी केलेले एक सरकारी बाँड बॉण्ड योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी त्या मूल्याच्या बाँड्स खरेदी करता. हे बाँड्स भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्फत जारी केले जातात. SGB मध्ये आपल्याला दरवर्षी २.५% व्याज मिळते, जे सोन्याच्या इतर कोणत्याही गुंतवणुकीमद्धे मिळत नाही

SGB हे भारत सरकार द्वारे म्हणजेच RBI रिजर्व बँक द्वारे बंधनात आहेत. हे बॉण्ड च्या माद्यमातून सोने मूल्यमापित केले जातात, म्हणजेच तुमचा इन्व्हेस्टमेंट बॉण्ड ची परतफेड सोने च्या मार्केट किंमतीनुसार दिली जाते.

SGB मधील गुंतवणुकीचे महत्वाचे मुद्दे

  • सुरक्षितता – SGB हे भारत सरकारद्वारे चालवली जाणारी महत्वाची गुंतवणूक योजना आहे जी RBI द्वारे तुम्हाला हमी देते, म्हणून सार्वभौम सुवर्ण बाँड खूप सुरक्षित मानले जातात.
  • मुदत – SGB हे बाँड सरासरी 8 वर्षांच्या कालावधीसाठी असतात, परंतु 5 वर्षांच्या नंतर तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता.
  • व्याजदर – SGB बाँड द्वारे तुम्हाला वार्षिक व्याज मिळते, जे दर सहा महिन्यांनी जमा केले जाते. व्याजदर साधारणत चालू रक्कमवर 2.50% चा असतो.
  • सोनेतल्या किंमतीच्या बदलांचा लाभ – जेव्हा तुमचा बाँड कालावधी पूर्ण होतो (म्हणजेच तुमचा बॉण्ड जेव्हा mature होतो), तेव्हा तुम्हाला गोल्ड बाजारातील बाजारभावाप्रमाणे परतावा मिळतो. म्हणजे, जर सोनेाच्या किंमती वाढल्या तर तुम्हाला तुमचा गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो.
  • टॅक्स फायदे – SGB बॉण्ड वर मिळणारे व्याज उत्पन्न म्हणून गणले जाते आणि त्यावर कर लागतो. परंतु, बाँडच्या पूर्ण झाल्यावर मिळणारे उत्पन्न भांडवली नफा (capital gain) म्हणून पूर्णपणे करमुक्त आहे.
  • डिजिटल आणि डीमॅट स्वरूपात – SGB बाँड हे डिजिटल स्वरूपात किंवा डीमॅट खाते धारकांसाठी उपलब्ध असतात हे तुम्ही तुमचा बँकेत जाऊन देखील खरेदी करू शकतात.
  • किमान आणि कमाल गुंतवणूक – SGB बाँडमध्ये किमान 1 ग्रॅम सोन्याच्या समतुल्य रक्कम गुंतवणूक करावी लागते. व्यक्तींसाठी कमाल 4 किलो आणि ट्रस्ट्ससाठी ह्याची मर्यादा 20 किलो पर्यंत गुंतवणूक मर्यादा आहे.

SGB Bond खरेदी केल्याने तुम्हाला सोन्याच्या मूल्यवाढीचा लाभ मिळतो आणि यासोबतच नियमित वार्षिक व्याज देखील मिळते, तसेच तुम्हाला सोने साठवण्याचा त्रासही होत नाही कारण हे संपूर्णतः डिजिटल आणि भारतसरकार कडे सुरक्षित आहे. त्यामुळे हे एक सुरक्षित आणि लाभदायक गुंतवणूक पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात.

SGB मध्ये गुंतवणूक कशी करावी

  • तुम्ही SGB Bond जारी केल्यावर राष्ट्रीयकृत बँका, पोस्ट ऑफिस आणि RBI च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता यासोबत तुम्ही डिजिटल स्वरूपात हे तुमचा डिमॅट अकाउंट मध्ये खरीदी करू शकतात.
  • SGB Bond करीत तुम्हाला KYC पूर्ण करणे आवश्यक आहे आणि तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
  • SGB साठी किमान गुंतवणूक ₹1 ग्राम सोने आहे.
  • तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार अधिक सोने खरेदी करू शकता.
  • SGB Bond मध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक मोबाइल द्वारे देकील करू शकतात. यामध्ये तुम्हाला डिजिटल डिमॅट अकाउंट असणे महत्वाचे आहे.

SGB मधील गुंतवणुकीचे जोखीम

  • सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होऊ शकतात आणि तुमची गुंतवणूक कमी देखील होऊ शकते.
  • SGB बॉण्ड लवकर परत केले जाऊ शकत नाहीत आणि त्यांना पपूर्ण कालावधीसाठी ठेवणे आवश्यक आहे.

SGB मधील गुंतवणूक योग्य आहे का?

जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड गुंतवणूक करण्याचा सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग शोधत असाल, तर SGB हा एक चांगला पर्याय असू शकतो. परंतु, गुंतवणूक करण्यापूर्वी सोनेच्या किंमतीतील चढ-उतार आणि SGB मध्ये गुंतवणुकीशी संबंधित जोखीम यांचा विचार पण करावा.

लक्षात ठेवा SGB मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही RBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: https://sovereigngoldbonds.rbi.org.in/

abhishek-Rodi

अभिषेक रोडी (Abhishek Rodi )

नमस्कार मी अभिषेक रोडी, वेबमराठी.नेट (webmarathi.net) या मराठी संकेतस्थळावर लेखक. तंत्रज्ञान, सरकारी योजना आणि आर्थिक नियोजन या क्षेत्रात मराठी भाषिकांना माहिती आणि मार्गदर्शन देणे हा माझा प्रयत्न आहे.

Leave a Comment