WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पीएम सूर्यघर मोफत वीज योजना संपूर्ण माहिती – PM Surya ghar Yojna २०२४

पंतप्रधान सूर्यघर योजना, ज्याला सूर्योदय योजना या नावाने देखील ओळखले जाते, ही भारतातील घरांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश हा देशभरातील १ कोटी घरांना मोफत सौर ऊर्जा उपलब्ध करून देणे आणि भारताची ऊर्जा स्वावलंबन वाढवणे आहे तर आजचा या ब्लॉगपोस्ट मध्ये आपण पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचि संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

पीएम सूर्यघर मोफत वीज योजना – मिळवा ३०० युनिट पर्येंत मोफत वीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना जाहीर केली आहे. ह्याचा प्रमुख उद्देश शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना सुरू करत असल्याचं पीएम मोदींनी म्हटले आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी स्पास्टिकरण देताना सांगितले कि 75,000 कोटींहून अधिक गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पात दरमहा सर्व लाभार्त्याना 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून 1 कोटी घरे उजळून टाकण्याचे उद्दिष्ट आहे ह्या योजना द्वारे केली जाणार आहे. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे.

सूर्यघर मोफत वीज या योजनेअंतर्गत आपल्या देशभरामध्ये रूट ऑफ सोलर सिस्टिमला चालना आणि प्रोत्सहन या योजने द्वारे देण्यात येणार आहे. देशातील सर्व नागरिकांना या योजनेचा फायदा होऊन यामध्ये अधिक उत्पन्न कमी वीज बिल आणि तसेच लोकांसाठी रोजगार निर्मिती होऊन रोजगाराला चालना मिळवण्याचा प्रयत्न आहे.

PM Sury Ghar योजनेअंतर्गत मिळणारे फायदे

  • दर महिन्याला सरासरी ३०० युनिटपर्यंत मोफत वीज या योजनेद्वारे मिळेल
  • सौर ऊर्जा प्रणालीवर ७८,००० रुपयांपर्यंत केंद्र सरकारकडून तुम्हाला अनुदान
  • वीज बिलात लक्षणीय बचत होईल
  • ऊर्जा स्वावलंबन वाढणे
  • प्रदूषण कमी होणे
  • भारतामध्ये या योजनेने रोजगार निर्मिती वाढेल

घरगुती सौरऊर्जा पॅनेल साठी सरकारी साह्यता अनुदान

PM Surya Ghar योजने अंतर्गत 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी खर्चाच्या 60% अनुदान तर 2 ते 3 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 40% पर्येंत केंद्रीय आर्थिक सहाय्य मिळवता येईल. सध्याच्या चालू किंमतीनुसार, 1 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 30,000 रुपयांचे अनुदान, 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 60,000 रुपयांचे अनुदान आणि 3 kW आणि त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी जास्तीत जास्त 78,000 रुपयांचे अनुदान सरकारद्वारे बँक खात्यात दिले जाईल.

या योजने अंतर्गत कुटुंबांना त्यांच्या छतांवर 3 kW पर्यंतच्या सौर पॅनल सिस्टीमच्या स्थापनेसाठी सुमारे 7% इतक्या तारण-मुक्त कमी व्याजदर असलेल्या सरकारमान्य बँकेतून कर्जाचा लाभ घेता येईल.

पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

महत्वाचे लागणारी कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • बँक खाते
  • मोबाईल नंबर
  • रेशन कार्ड
  • विज बिल
  • आय प्रमाणपत्र
  • पत्ता

PM Surya Ghar योजनेसाठी अर्ज अशा प्रकारे करा

  • Pm Surya Ghar या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम यांच्या ऑफिसिअल वेबसाईटवर जायचे आहे. PM Surya Ghar Muft Bijali Yojana Maharashtra
  • https://pmsuryaghar.gov.in/ या official वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेज ओपन होईल.
  • होमपेज ओपन झाल्यानंतर आपल्याला याच्या उजव्या बाजूला apply for Rooftop Solar हा पर्याय दिसेल या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्याला समोर एक नवीन पेज ओपन होईल
  • यामध्ये आपल्याला आपली संपूर्ण अचूक माहिती भरायची आहे.
  • जसे कि यामध्ये आपल्याला आपल्या राज्याचे नाव जिल्ह्याचे नाव निवडायचे आहे.
  • यानंतर आपल्याला आपल्या वितरण केंद्राचे नाव सिलेक्ट करायचे आहे जसे कि तुम्ही MSEB निवडू शकतात.
  • यानंतर आपल्याला आपला वीज वितरण ग्राहक खाते क्रमांक टाकायचा आहे आणि पुढील पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्यासमोर एक नोंदणी फॉर्म ओपन होईल. या नोंदणी फॉर्म मध्ये आपल्याला आपली विचारलेली सर्व माहिती भरायची आहे अचूकपणे जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
  • माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला आवश्यक ती रजिस्टर कागदपत्रे यामध्ये अपलोड करायचे आहे. आणि आता आपल्याला सबमिट बटन यावर क्लिक करायचे आहे.
  • तर वेबमराठी वाचकांनो आपण अशा प्रकारे आपला PM Surya Ghar Muft Bijali Yojana पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज तयार झाला आहे.

तुम्ही पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता

abhishek-Rodi

अभिषेक रोडी (Abhishek Rodi )

नमस्कार मी अभिषेक रोडी, वेबमराठी.नेट (webmarathi.net) या मराठी संकेतस्थळावर लेखक. तंत्रज्ञान, सरकारी योजना आणि आर्थिक नियोजन या क्षेत्रात मराठी भाषिकांना माहिती आणि मार्गदर्शन देणे हा माझा प्रयत्न आहे.

Leave a Comment