WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ई-श्रम कार्ड काय आहे ? फायदे, पात्रता आणि E Shram Card Online कसे रजिस्टर करायचे 2024

E-Shram Card 2024 : नमस्कार मित्रांनो, जसे किआपल्याला कामगारांचे जीवन किती कष्टाचं असता हे जाणतो. दिवसाचा खर्च भागवण्यासाठी पळापळ भविष्याची अनिश्चितता या सगळ्यांशी कामगार वर्ग रोजच झगडत असतो, पण आता भारत सरकार तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे! असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी सुरू असलेली ई-श्रम योजना (e-shram yojana) तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हेच आपण आज याला ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत

E Shram Card या योजने अंतर्गत तुम्ही मोफत ई-श्रम कार्ड बनवू शकता. हे कार्ड तुमच्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप महत्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला दुर्घटना मृत्यू झाल्यास २ लाख रुपयांचा विमा तर वृद्धापकाळात दर महिना ३ हजार रुपये इतकी पेंशन आणि इतर सरकारीसह्यता मिळू शकते.

e-shram card काय आहे ?

ई-श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आपल्या भारत सरकारची एक नवीन योजना आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश या कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांच्या जीवनात अधिक सुधारणा घडवून आणणे हि आहे.

E Shram Card या योजने अंतर्गत, 16 ते 59 वर्षे वयोगटातील, आणि EPFO, ESIC किंवा NPS सारख्या कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेत नोंदणीकृत नसलेला कामगार वर्ग यांकरिता E Shram Card 2024 ते रजिस्टर करू शकतात. हे कार्ड बनवणे पूर्णतः मोफत आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा उत्तीर्ण होण्याची देखील आवश्यकता नाही. या भारतसरकार च्या योजनेद्वारे अनेक महत्त्वाचे फायदे कामगारांना मिळतात. यात दुर्घटना विमा, पेंशन तसेच कर्जावरील व्याज सवलत आणि इतर विविध सरकारी योजनांचा लाभ यांचा ह्यामध्ये समावेश आहे.

ई-श्रम कार्डाचे महत्वाचे फायदे (Benefits)

  • सरकारद्वारे आर्थिक मदत – यामध्ये निवृत्ती, अपंगत्व किंवा मृत्यूच्या प्रकरणात सरकारद्वारे आर्थिक मदत केली जाईल.
  • विमा संरक्षण – अपघात विमा आणि जीवनावधी विमा सरकारद्वारे दिला जाईल.
  • मुलांच्या शिक्षण शुल्क आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल.
  • आरोग्य सुविधा मोफत मिळेल आणि आरोग्य विमा व औषधोपचार सुविधा देण्यात येईल.
  • राशन कार्ड, घरे, स्वच्छतागृहे आणि इतर सुविधांसाठी कामगार वर्गाला प्राधान्य भेटेल.

ई-श्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

हे कार्ड ला रजिस्टर करण्यापूर्वी त्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात हे माहिती पाहिजे ते खालीलप्रमाणे आहे

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • ईमेल आयडी

पात्रता:

  • 18 ते 59 वर्षे वयोगटातील कामगार.
  • दरमहा ₹15,000 पेक्षा कमी कमावणारे कामगार.
  • कोणत्याही इतर सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ न घेणारे.

ई-श्रम कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा २०२४

  • सरकारी ऑफिसल वेबपोर्टल https://eshram.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन ई-श्रम कार्डसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यासाठी, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, मोबाइल नंबर आणि इतर आवश्यक माहिती द्यावी लागेल दिलेल्या पात्रता प्रमाणे.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक अप्लिकेशन नंबर मिळेल.
  • ई-श्रम कार्डसाठी तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, तुम्हाला तुमचा ई-श्रम कार्ड तुमच्या घरी पोस्ट ऑफिस द्वारे पाठवण्यात येईल.
  • ई-श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्वाची योजना आहे. या योजनेचे अनेक फायदे आहेत आणि पात्रता निकष खूप कमी आहेत. तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करत असाल तर, मी तुम्हाला आजच ई-श्रम कार्डसाठी अर्ज करण्याचे आवाहन करतो. याचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप फायदा मिळू शकतो.

ई-श्रम कार्ड हे एक डिजिटल ओळखपत्र आहे जे असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करते आणि त्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत करते हे भारत सरकारद्वारे कामगारांसाठी आणलेली उपयुक्त योजना आहे जर तुही ह्यासाठी पात्र असाल तर नक्की याचा लाभ घ्या.

धन्यवाद ! जर तुम्हला काही प्रश्न असतील तर तुम्ही कंमेंट देखील करू शकतात.

abhishek-Rodi

अभिषेक रोडी (Abhishek Rodi )

नमस्कार मी अभिषेक रोडी, वेबमराठी.नेट (webmarathi.net) या मराठी संकेतस्थळावर लेखक. तंत्रज्ञान, सरकारी योजना आणि आर्थिक नियोजन या क्षेत्रात मराठी भाषिकांना माहिती आणि मार्गदर्शन देणे हा माझा प्रयत्न आहे.

Leave a Comment