WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CIBIL Score काय असतो? बँक कर्ज देताना Credit Score का पाहतात?

Credit Score: तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत आहात का? तर तुम्हाला तुमच्या बँकेला तुमचा Credit Score हा दाखावावा लागतो आणि तो चांगला असेल तरच तुम्हाला तुमची बँक कर्ज देऊ शकते. याच स्कोअरला आपण Credit Score असे म्हणतो. बँकेकडून कोणत्याही प्रकारचे लोण घेण्यासाठी किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी क्रेडिट साकोरे हा अनिवार्य आहे ह्यातून तुमचे रेकॉर्डस् चेक केले जातात.

जर तुम्हाला क्रेडिट साकोर किंवा सिबिल साकोर बद्दल जास्त माहिती नसेल तर काळजी करू नका, आज आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये सिबिल स्कोअर बद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळे हा लेख तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आणि यातून आर्थिक ज्ञान मिळणारआहे त्यामुळे हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.

CIBIL Score काय असतो?

CIBIL चा फुल जर फॉर्म पाहीलंतर Credit Information Bureau of India Limited असा आहे. CIBIL Score हा तुमच्या मागील घेतलेले कर्ज किंवा क्रेडिट इतिहासाचं एक मोजमाप आहे. जो 300 ते 900 पर्यंतच्या अंकांमध्ये दर्शविला जातो. जास्त CIBIL Score हे चांगल्या क्रेडिट इतिहासाचं आणि जबाबदार कर्जदार होण्याचं लक्षण आहे.

CIBIL Score हे व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्रीचे विश्लेषण करून तयार केला जातो. हा स्कोअर सामान्यतः 300 ते 900 च्या दरम्यान असतो, आणि तो जितका जास्त असेल तितके तुम्ही चांगला कर्जदार मानले जाता. यामध्ये 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर हा चांगला मानला जातो. क्रेडिट स्कोअर हा तुमच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेबद्दल बँका आणि वित्तीय संस्थांना माहिती देते जेणेकरून ते तुम्हला कमी वेळेमध्ये देखी कर्ज देऊ शकतात.

क्रेडिट किंवा CIBIL एवढा महत्वाचा का आहे

Credit Score किंवा CIBIL हा खालीलप्रमाणे महत्वाचा आहे

कर्ज मिळण्यासाठी

आपल्याला बँकेद्वारे कर्ज मिळेल की नाही हे पूर्णतः तुमच्या CIBIL स्कोरवरती अवलंबून असते. आपला CIBIL स्कोअर जेवढा जास्त असेल तेवढाजास्त तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता असते. जर कोणाचा CIBIL स्कोर कमी असेल तर त्या व्यक्तीला कर्ज मिळणे कठीण होऊ शकते किंवा त्याच्याकडून जास्त माहिती गोळा केली जाऊ शकते.

क्रेडिट कार्ड

सध्या सर्वांनाच क्रेडिटकार्ड मिळावे असे वाटते परंतु आपल्याला मिळणारे क्रेडिट कार्ड हे पूर्णपणे आपल्या CIBIL स्कोरवर अवलंबून असते. तुमचा CIBIL स्कोर जितका जास्त असेल तर तुम्हाला चांगल्या सुविधा असलेले क्रेडिट कार्ड मिळू शकते परंतु जर कमी CIBIL स्कोअर असेल त्यांना कमी क्रेडिट मर्यादा आणि उच्च व्याज दर असलेले क्रेडिट कार्ड मिळू शकते.

व्याज दर

तुम्हाला तुमच्या कर्जावर मिळणारा व्याज दर सुद्धा तुमच्या CIBIL स्कोरवर अवलंबून असतो. तुमचा CIBIL स्कोर जेवढा जास्त असेल, तेवढेच कमी व्याज दर मिळू शकतो. कमी CIBIL स्कोर असलेल्या व्यक्तीला जास्त व्याज दर द्यावा लागू शकतो ज्याचे नुकसान तुम्हाला होऊ शकते.

विमा खरेदी

काही विमा कंपन्या तुमचा विमा प्रीमियम निश्चित करण्यासाठी तुमचा CIBIL Score विचारात घेतात. उच्च CIBIL Score असल्यास तुम्हाला कमी प्रीमियम भरावे लागू शकतात हा हि फायदा तुम्हाला फायदा मिळतो.

CIBIL Score मधील महत्वाचे (CIBIL Score Range)

सिबिल स्कोअर हा 300 ते 900 पर्यंतच्या अंकामध्ये असतो. तुमचा सिबिल स्कोअर तुम्हाला तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये मिळतो सिबिल स्कोअर आपण खालीलप्रमाणे वाचू शकतो परंतु प्रत्येक बँक किंवा कर्ज देणारे वेगवेगळ्या पद्धतीने देखील हायला पाहू शकतात

  • 300-599: हा साकोर कमी आणि खराब मानला जातो तुम्हाला कर्ज मिळण्यास अडचण देखील येऊ शकते.
  • 600-699: हा स्कोअर मध्यम मानला आहे व तुम्हाला कर्ज मिळू शकते पण ह्यामध्ये तुम्हाला जास्त अति आणि व्याज लागू शकते.
  • 700-799: हा स्कोअर वेवस्तीत मानला जातो आणि तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता इतरांपेक्षा अधिक असते आणि ह्यामध्ये व्यजदार पण कमी असेल.
  • 800-900: हा स्कोअर सर्वउत्तम मानला जातो आणि तुम्हाला अगदी सहज कर्ज मिळू शकते.

तुमचा CIBIL Score कसा चेक करता येईल

तुमचा क्रेडिट स्कोर तुम्ही अनेक मार्गांनी तपासू शकता यामध्ये तुम्ही खलील दिलेले पर्याय पाहू शकता

  • CIBIL अधिकृत वेबसाइट – तुम्ही https://www.cibil.com/ संकेतस्थळावर वर विनामूल्य एक अहवाल मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, जन्म तारीख आणि पॅन कार्ड क्रमांक नोंदवावा लागेल.
  • ऑनलाइन क्रेडिट स्कोअर वेबसाइट्स – अनेक वेबसाइट्स सध्या विनामूल्य किंवा कमी शुल्कात CIBIL Score देतात. (वेबमराठी च्या चाचपणी नुसार तुम्ही हा पर्याय वापरू नका ह्या तुम्हाला काही नको असलेले कॉल्स किंवा संदेश देखील यौ शकतात)
  • तुमची बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी – काही बँका किंवा क्रेडिट कार्ड कंपनी तुम्हाला तुमचा CIBIL Score विनामूल्य देतात.
  • मोबाइल ऍप्लिकेशन्स: अनेक ऍप्लिकेशन्स तुम्हाला तुमचा CIBIL Score तपासण्याची सुविधा देतात. ह्यामध्ये देखील तुम्ही तुमचा मानक अंक पाहू शकता जसे कि OneScore, CIBIL अँप्लिकेशन.

abhishek-Rodi

अभिषेक रोडी (Abhishek Rodi )

नमस्कार मी अभिषेक रोडी, वेबमराठी.नेट (webmarathi.net) या मराठी संकेतस्थळावर लेखक. तंत्रज्ञान, सरकारी योजना आणि आर्थिक नियोजन या क्षेत्रात मराठी भाषिकांना माहिती आणि मार्गदर्शन देणे हा माझा प्रयत्न आहे.

Leave a Comment