WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयुष्मान भारत आरोग्य खाते काय आहे संपूर्ण माहिती Ayushman Bharat Card २०२४

Ayushman Bharat Health Card – आयुष्मान भारत आरोग्य खाते, ज्याला आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) म्हणूनही ओळखतो, आभा ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना ज्यामध्ये प्रमुख्याने भारत सरकारद्वारे मोफत आरोग्य सुविधा प्रदान केली जाते. हे कार्ड विनामूल्य आहे आणि तुम्ही ते तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्रातून किंवा अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करून मिळवू घरबसल्या मिळवू शकता.

आयुष्मान भारत कार्ड काय आहे? (Ayushman Bharat Card in Marathi)

Ayushman Bharat Health Card हे एक सरकाद्वारे दिले जाणारे Digital Health Id Card आहे ज्या अंतर्गत तुम्हाला 14 अंकी आयुष्मान भारत खाते क्रमांक प्रदान केला जातो जो तुम्हाला भारताच्या डिजिटल हेल्थकेअर इकोसिस्टममधील सहभागी म्हणून ओळख देतो. आयुष्मान भारत कार्ड हे प्रामुख्याने यातील वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्याच्या नोंदी हॉस्पिटल, दवाखाने, विमा प्रदाते आणि इतरांसोबत डिजिटलपणे एकाचठिकाणी संग्रहित आणि सामायिक करण्यास अनुमती देते. आभा हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे.

आयुष्मान भारत कार्ड हे रुग्णांना वेगवेगळ्या आरोग्य योजनांमध्ये सहभागी होण्यास मदत करते, ज्या अंतर्गत यातील लाभार्थीना 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत मिळतो. आयुष्मान भारत आरोग्य कार्ड काढण्यासाठी, आधार कार्ड किंवा वाहतूक परवाना यापैकी एक Document असणे आवश्यक आहे. हे कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने काढता येते.

Ayushman Bharat Health Card वैद्यकीय संबंधित माहिती जसे की अहवाल, निदान, औषधांचे प्रिस्क्रिप्शन इत्यादी काही क्लिकवर ऍक्सेस करू शकतात, ज्यामुळे डॉक्टरांना भविष्यातील रूग्णांवर वैद्यकीय माहितीसह उपचार करणे अगदी सोपे होते.

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड चे फायदे

  • या योजनेचा माध्यमातून मोफत आरोग्य विमा ज्यामधून रु. 5 लाख पर्यंतचे वार्षिक आरोग्य विमा संरक्षण मिळते.
  • हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार दिला जातो यात सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये विविध प्रकारच्या आजारांसाठी मोफत उपचार देण्याची सोय आहे.
  • या कार्ड्स च्या उपयोगकर्त्यांसाठी डॉक्टर, तज्ञ आणि इतर आरोग्य सेवा प्रदात्यांची सेवा उपलब्ध केली जाते.
  • औषधे आणि निदान हे पूर्णपणे मोफत आहे ज्यामध्ये औषधे, नमुने आणि निदान सुविधा आहे.

आयुष्मान भारत कार्ड साठी कोणते कागदपत्रे लागतात? (Documents)

कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे –

  • मोबाईल नंबर
  • आधार कार्ड नंबर किंवा पॅन कार्ड नंबर किंवा ड्रायविंग लायसन्स नंबर


वरील पैकी कोणतेही एक कागदपत्रे तुमच्याजवळ असेल तरी तुम्ही हे आयुष्मान भारत कार्ड काढू शकता.

आयुष्मान भारत कार्ड काढायचे? (How to apply ayushman bharat card))

  • तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या जनसेवा केंद्रात किंवा आरोग्य सुविधेत जाऊन या कार्ड साठी अर्ज करू शकता.
  • तुम्ही स्वतः https://beneficiary.nha.gov.in/ ह्या पोर्टल वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.

आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड कसे करावे? Ayushman Bharat Card Download

तुम्हाला जर तुमच्या मोबाईलद्वारे आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड किंवा सेव करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा-

  • पहिले healthid.ndhm.gov.in ही अधिकृत वेबसाइट उघडा.
  • तुमचे खाते Login करा (मोबाईल नंबर किंवा तुमचे Ayushman Bhara account नंबर टाका, Captcha भरा आणि Next वरती क्लिक करा)
  • OTP ने व्हेरिफाय करा
  • तुम्हाला तुमचे कार्ड दिसेल त्यावरती Download Card हा पर्याय आहे यावर क्लिक करा.
  • तुमचे कार्ड डाउनलोड होईल अशा प्रकारे तुम्ही तुमचे आयुषमान भारत कार्ड डाउनलोड करू शकता.

अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारच्या ABHA च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: https://beneficiary.nha.gov.in/ किंवा हेल्पलाइन नंबर 1800-111-5656 वर कॉल करून संपर्क साधू शकतात.

जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कंमेंट देखील करू शकतात.

जर तुम्हाला हे आर्टिकल महत्वाचे आणि फायद्याचे वाटत असलं तर इतरांसोबत देखील share करायला विसरू नका धन्यवाद !

Visit WebMarathi for latest knowledgeable Marathi articles that helps you

abhishek-Rodi

अभिषेक रोडी (Abhishek Rodi )

नमस्कार मी अभिषेक रोडी, वेबमराठी.नेट (webmarathi.net) या मराठी संकेतस्थळावर लेखक. तंत्रज्ञान, सरकारी योजना आणि आर्थिक नियोजन या क्षेत्रात मराठी भाषिकांना माहिती आणि मार्गदर्शन देणे हा माझा प्रयत्न आहे.

Leave a Comment