WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अँटीव्हायरस म्हणजे काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती Antivirus in Marathi

आपण जर कॉम्पुटरर किंवा लॅपटॉप वापरत असाल तर तुम्हालां सर्वाना Antivirus बद्दल थोडीशी माहिती असेलच. कॉम्पुटर वायरस हा आपल्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉप साठी खूप हानिकारक असतो, त्यामुळे अशा वायरस ला रोखण्यासाठी Antivirus कॉम्पुटर मध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या कॉम्पुटर मेमरी मध्ये अनेक महत्त्वाच्या फाईल असतात, यासोबतच वयक्तिक फोटो, विडिओ, ई गोष्टी आपण संगणक मध्ये साठवून ठेवत असतो. हा वायरस या सर्व महत्त्वाच्या फाईल वर डिरेक्टली घात करते व त्यांना नुकसान पोहचवते, त्यामुळे त्या निकामी होऊन जातात यासोबतच तुमचे कॉम्पुटर स्लो देखील होऊ शकते. आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण अँटीव्हायरस म्हणजे काय, त्याचे प्रकार, फायदे, इत्यादी माहिती पाहणार आहोत.

Antivirus म्हणजे काय ?

अँटीव्हायरस हे एक सॉफ्टवेअर आहे जे तुमच्या संगणक, लॅपटॉप किंवा मोबाइल डिव्हाइसला व्हायरस, स्पायवेअर आणि इतर दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअर किंवा नको असलेल्या फाइल्स पासून वाचवण्यासाठी उपयोगात आणले जाणारे महत्वपूर्ण सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर तुमच्या डिव्हाइसवरून डेटा चोरी होण्यापासून आणि तुमच्या डिव्हाइसचे कामकाज बंद किंवा फ्रॉड होण्यापासून मदत करण्यास सक्षम असते.

अँटीव्हायरस कार्य कसे करते ?

  • व्हायरस डेटाबेस – अँटीव्हायरस सॉफ्टवेअरमध्ये ओळखल्या गेलेल्या व्हायरस आणि इतर दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअरची यादी असलेला डेटाबेस पहिल्यापासून असते त्यामुळे तोम्प्युटर मधील व्हायरस सापडवने सोपे होते.
  • स्कॅनिंग – अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तुमच्या डिव्हाइसवर आणि त्यात साठवलेल्या सर्व फाइल्सवर नियमीत स्कॅन करते आणि त्याचा रिपोर्ट तुम्हाला दिला जातो.
  • संशयास्पद ओळखणे – अँटीव्हायरस सॉफ्टवेअर व्हायरस आणि इतर दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअर द्वारे दर्शविल्या जाणाऱ्या संशयास्पद क्रियाकलाप ओळखण्यास सक्षम जयचा फायदा हे रोखण्यासाठी होतो.
  • दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअर बंद करणे – अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तुमच्या डिव्हाइसवरून दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअरला बंद आणि कायमस्वरूपी हटवण्यात सक्षम आहे.

अँटीव्हायरस हे संगणक मधील वायरस शोधून एंटीवायरस त्याला कायमस्वरूपी साठी हटवून टाकते व संगणकातील फाईल्स सुरक्षित करते. अँटीव्हायरस हे सॉफ्टवेर च्या पद्धतीने इंटरनेट वरून येणाऱ्या नवीन वायरस ला संगणक पासून दूर ठेवते. इंटरनेट वर आपण जर असुरक्षित वेबसाईटवर गेलो तर अँटीव्हायरस लगेच आपल्याला सूचित करते किंवा कोणती फाईल डाउनलोड करायची असेल तर अँटीव्हायरस सर्वात पहिले ती स्कॅन करते व सुरक्षित असेल तरच डाउनलोड करण्यास परवानगी देते नाहीतर रद्द करते.

काही लोकप्रिय अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स

आपल्याला जर डेस्कटॉप कॉम्पुटर साठी किंवा लॅपटॉप साठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर विकत घ्यायचे असेल तर खालील नावे आपल्यासाठी उपयुक्त ठरतील दिलेली नवे आणि सॉफ्टवेर्स हे प्रसिद्ध आहेत.

  • McAfee AntiVirus Plus
  • Bitdefender Antivirus Plus
  • Norton AntiVirus Plus
  • Kaspersky Anti-Virus
  • Webroot SecureAnywhere AntiVirus
  • ESET NOD32 Antivirus
  • Malwarebytes Premium
  • F-Secure Anti-Virus


वरील अँटीव्हायरस सॉफ्टवेअर निवडताना तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य सॉफ्टवेअर निवडा तुमच्या डिव्हाइस आणि तुमच्या ऑनलाइन वर्तनासाठी योग्य असलेले सॉफ्टवेअर निवडा.

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरण्यामुळे तुमचा संगणक सुरक्षित राहतो आणि विविध हानिकारक प्रोग्राम्सपासून संरक्षित राहतो. त्यामुळे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर नक्कीच इंस्टॉल करणे आवश्यक आहे.

धन्यवाद ! जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असलं तर इतरांसोबत नक्की share करा आणि काही मदत हवी आल्यास तुम्ही खाली कंमेंट देखील करू शकतात.

abhishek-Rodi

अभिषेक रोडी (Abhishek Rodi )

नमस्कार मी अभिषेक रोडी, वेबमराठी.नेट (webmarathi.net) या मराठी संकेतस्थळावर लेखक. तंत्रज्ञान, सरकारी योजना आणि आर्थिक नियोजन या क्षेत्रात मराठी भाषिकांना माहिती आणि मार्गदर्शन देणे हा माझा प्रयत्न आहे.

Leave a Comment